महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक शहरात ड्रोनद्वारे केली जाणार सॅनिटायझरची फवारणी - प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग

नाशिक शहर कोरोनाचा सर्वाधिक मोठा हॉटस्पॉट म्हणून समोर येत आहे. यामुळे नाशिक शहरात कंटेनमेंट झोनची संख्यादेखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यात नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता परिसरात सॅनिटायझर फवारणी करणे आवश्यक असल्याने आता डिजिटल टेक्नोलॉजीचा वापर करून शहर सॅनिटायझ करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल पुढे टाकले आहे.

ड्रोनव्दारे फवारणी
ड्रोनव्दारे फवारणी

By

Published : May 12, 2021, 4:27 PM IST

नाशिक -शहरामध्ये एकीकडे लॉकडाऊन होत असताना दुसरीकडे शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर ड्रोनच्या मदतीने सॅनिटायझरची फवारणी करण्याचा प्रयोग केला जात आहे. शहरातील कारंजा परिसरात प्रायोगिक तत्त्वावर प्रशासनाच्या वतीने हा प्रयोग करण्यात आला आहे.

नाशिक शहरात ड्रोनद्वारे केली जाणार सॅनिटायझरची फवारणी

प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग

नाशिक जिल्ह्यात दहा दिवसांच्या लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. नाशिक शहर कोरोनाचा सर्वाधिक मोठा हॉटस्पॉट म्हणून समोर येत आहे. यामुळे नाशिक शहरात कंटेनमेंट झोनची संख्यादेखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यात नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता परिसरात सॅनिटायझर फवारणी करणे आवश्यक असल्याने आता डिजिटल टेक्नोलॉजीचा वापर करून शहर सॅनिटायझ करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल पुढे टाकले आहे. नाशिक शहरातील प्रमुख रस्त्यांवर ड्रोनच्या मदतीने सॅनिटायझरची फवारणी करण्याचा प्रयोग बुधवारी (आज) केला गेला आहे. नाशिकच्या कारंजा परिसरात प्रायोगिक तत्त्वावर प्रशासनाच्यावतीने हा प्रयोग पार पडला. दरम्यान, हा प्रयोग यशस्वी झाल्यास शहरातील इतर भागांमध्ये देखील या प्रयोगाची लवकरच अंमलबजावणी केली जाणार, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी यांनी दिली आहे.

या भागांंमध्ये होणार प्रयोग

बंगळुरुच्या गरुडा एरोस्पेस या कंपनीच्या माध्यमातून हा प्रयोग नाशिकमध्ये राबविण्यात आला आहे. प्रायोगिक तत्त्वावर नाशिकमधील कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या 13 भागांमध्ये हा प्रयोग करण्यात येणार आहे. या ड्रोनची 12 लिटर सॅनिटायझर इतकी क्षमता असून एकाच वेळी जवळपास एक एकरवरील क्षेत्र यामुळे सॅनिटाइझ होणार असल्याने शहरभरात सॅनिटायझेशन करण्याच्या कामात यामुळे अधिक सुलभता येणार आहे.

हेही वाचा-पाच राज्यांच्या विधानसभेतील पराभवाच्या विश्लेषणासाठी अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात काँग्रेसची समिती

ABOUT THE AUTHOR

...view details