नाशिक - उड्डाणपुलावरून ऑईल कॅन घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने हजारो लिटर ऑईल रस्त्यावर सर्वत्र पसरले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नाशिकच्या उड्डानपुलावरून ऑईल कॅन घेऊन जाणारा ट्रक पलटी; हजारो लिटर ऑईल रस्त्यावर - ऑईल कॅन
नाशिकमधील उड्डाणपुलावरून ऑईल कॅन घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने त्यातील हजारो लिटर ऑईल रस्त्यावर पडले. या घटनेत चालक आणि वाहक हे गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेमुळे रस्त्यावर सर्वत्र ऑईल पसरले. यामुळे काही काळ इंदिरानगर परिसरातील महामार्गालगतची वाहतूक खोळंबली होती. मात्र, नाशिक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, रस्त्यावर ऑईल पसरल्याने वाहनचालकांना आपली वाहने हळूवार न्यावी लागत होती.
ट्रकची उड्डाणपूलाला धडक बसल्यामुळे त्याचा कठडा तुटला आणि ट्रक पलटी झाला. या घटनेत ट्रकमधील हजारो लिटर ऑईल रस्त्यावर पडले असून चालक आणि वाहक हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस करत आहेत.