दिंडोरी ( नाशिक ) - दिंडोरी तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव आहे. तालुक्यात १९१ रुग्ण असून १३१ बाधितांनी कोरोनावरती मात केली आहे. तर ५२ रुग्ण ऍक्टिव्ह आणि आठ रुग्ण दगावले आहेत.
दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व पालखेड औदयोगिक क्षेत्रामध्ये चोविस तासात एकशे एक रुग्ण मिळाले आहेत. त्यापैकी आठ रुग्ण हे दिंडोरी नगरपंचायत व दिंडोरी तालुक्यातील आहेत. ९३ रुग्ण हे नाशिक येथील असून तीन कंपनीमध्ये काही अधिकारी व कर्मचाऱ्यांरी आहेत. ज्या कंपनीत रुग्ण आढळले आहेत त्या कंपन्या सात दिवस बंद करण्याचे पत्र प्रशासनाने दिले आहेत. प्रशासनाच्या मार्फत त्यांना जोपर्यत पुढील आदेश प्राप्त होत नाही तोपर्यत कंपनी बंद ठेवावेत. आपल्या शेजारी जो कोणीही व्यक्ती उभा असल्यास तो पॉझिटीव्हच आहे, असे समजावे. आपण त्यापासून ठराविक अंतर ठेवायला हवे, असे तालुका वैद्यकीय अधिकारी सुजित कोशीरे यांनी इटीव्ही भारतशी बोलतांना सांगीतले.