महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गेल्या पाच वर्षातील कारभार शेतकऱयांसाठी कर्दनकाळ - डॉ. गिरधर पाटील - भाजप सरकार

शेती व शेती पिकासाठी योग्य तो हमीभाव न मिळाल्याने शेतकरी नाराज असून जीएसटी, नोटबंदीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारे निर्णय भाजप सरकारने घेतल्याचे गिरधर पाटलांनी सांगितले.

डॉ. गिरधर पाटील

By

Published : Apr 23, 2019, 5:14 PM IST

नाशिक - शेतकरी चळवळीत गेली पंचवीस वर्षे घालवली असली तरी २०१४ ते १९ या कालखंडाने शेतकऱ्यांना फार मोठा धडा शिकवला आहे. शेतकरी व शेतीच्या दृष्टीने गेल्या पाच वर्षातील भाजप सरकारचा कारभार कर्दनकाळ ठरला असल्याची टीका, डॉ. गिरधर पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.

डॉ. गिरधर पाटील

शेतकरी विरोधी असलेल्या या भाजप सरकारला पायउतार करण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांना पाठिंबा जाहीर करत असल्याचे गिरधर पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्व शेतकरी बांधव त्यांच्या पाठिशी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी शेतकरी प्रतिनिधी शिवाजी खैरनार, दिलीप कुवर उपस्थित होते

शेती व शेती पिकासाठी योग्य तो हमीभाव न मिळाल्याने शेतकरी नाराज असून जीएसटी, नोटबंदीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारे निर्णय भाजप सरकारने घेतल्याचे गिरधर पाटलांनी सांगितले.

शेतीच्या विविध प्रश्नांवर आजपर्यंत डॉ. गिरधर पाटील यांनी आंदोलन करून शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडून मागण्या पूर्ण केल्या आहेत. शेतकरी चळवळीतील दिलेल्या योगदानाबद्दल नाशिक जिल्ह्यातील शेतकरी त्यांच्या पाठिशी असून त्यांच्या या निर्णयामुळे भाजप सरकारला मोठा फटका बसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details