नाशिक- दिंडोरी लोकसभा भाजपा उमेदवार डॉ. भारती पवार १ लाख ९८ हजार ७७३ मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्या आहेत. दिंडोरी मतदार संघात त्यांनी राष्ट्रवादीचे धनराज महाले यांना पराभूत करून मिळवलेला विजय अनेकांसाठी धक्का मानला जात आहे. या विजयामुळे छगन भुजबळसह जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांची समीकरणे बदलणार असून येणाऱ्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादीसाठी मोठे आव्हान उभे असनार आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात डॉ.भारती पवार विजयी - dindori'
दिंडोरी लोकसभा भाजपा उमेदवार डॉ. भारती पवार १ लाख ९८ हजार ७७३ मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्या आहेत. दिंडोरी मतदार संघात त्यांनी राष्ट्रवादीचे धनराज महाले यांना पराभूत करून मिळवलेला विजय अनेकांसाठी धक्का मानला जात आहे.
![दिंडोरी लोकसभा मतदारसंघात डॉ.भारती पवार विजयी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3368878-621-3368878-1558643046262.jpg)
डॉ. भारती पवार यांना ५ लाख ६७ हजार ४७० एकूण मते मिळाली आहेत. दिंडोरी मतदारसंघातील नांदगाव आणि येवला हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ भुजबळ कुटुंबाच्या ताब्यात असून नांदगाव येथे छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज तर येवला येथे खुद्द छगन भुजबळ हे आमदार असूनही या दोन्ही मतदारसंघातून डॉ. भारती पवार यांना मोठ्या प्रमाणात मत मिळाली. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पवार यांनी मारलेली मुसंडी भुजबळांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
गेल्या तीन निवडणुकीत भाजपची सत्ता असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदार संघात यंदा भाजपने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याऐवजी डॉ. भारती पवार यांना रिंगणात उतरविले होते. यंदा मात्र पवार भाजपाच्या तिकीटावर विजयी झाल्या आहेत. गेल्या वेळी ज्या पक्षाकडून त्या पराभूत झाल्या होत्या त्याच पक्षाच्या तिकिटावर यंदा त्यांचे खासदारकीचे स्वप्न पूर्ण झाले आहे.