महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उत्तर महाराष्ट्रात डोंगरदेव उत्सवाची धूम

डोंगराच्या सानिध्यात राहणारे व डोंगरातील साधन सामुग्रीवर उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी बांधवांचा डोंगराशी नित्य संपर्क येत असल्याने ते डोंगराला आपला देव मानतात. आजारपण जावू दे, गुरा-ढोरात वाढ होवू दे, वनसंपत्तीचे संरक्षण, कौटुंबिक तसेच सामाजिक सलोख्याचे वातावरण राहवे याकरता साकडे घालून डोंगरदेव उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे

By

Published : Dec 9, 2019, 5:50 PM IST

Updated : Dec 9, 2019, 9:12 PM IST

nashik
डोंगरदेव उत्सवाची धूम

नाशिक - उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असलेला डोंगरदेव उत्सव ठिकठिकाणी भक्तीमय वातावरणात साजरा केला जात आहे. डोंगरदेव उत्सवाची प्रथा उत्तर महाराष्ट्रातील गाव पाड्यात राहणारे व सातपूडा तसेच सह्याद्रीच्या पर्वत रांगेत, अतिदुर्गम भागात डोंगराच्या कुशीत राहणारे कोकणा, कोकणी, महादेव कोळी, भिल्ल, वारली, पावरा, मावची आदी जमातीचे आदिवासी बांधव शेकडो वर्षांपासून परंपरागत पद्धतीने मोठ्या श्रद्धेने जपत आहेत.

डोंगरदेव उत्सव

डोंगराच्या सानिध्यात राहणारे व डोंगरातील साधन सामुग्रीवर उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी बांधवांचा डोंगराशी नित्य संपर्क येत असल्याने ते डोंगराला आपला देव मानतात. आजारपण जावू दे, गुरा-ढोरात वाढ होवू दे, वनसंपतीचे संरक्षण, धनधान्य चांगले पीकण्यासाठी, संकटांपासून मुक्ती व कौटुंबिक तसेच सामाजिक सलोख्याचे वातावरण राहवे याकरिता साकडे घालून डोंगरदेव उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे

उत्तर महाराष्ट्रात डोंगरदेव उत्सवाची धूम

उत्तर महाराष्ट्रातील सातपूडा व सह्याद्रीच्या पर्वत रांगेत, अतिदुर्गम भागात व डोंगराच्या कुशीत राहणाऱ्या आदिवासींचे जीवन म्हणजे एक प्रकारची खडतर तपश्चर्याच आहे. जीवन संघर्षाच्या वाटचालीत परंपरागत चालत आलेल्या सामुदायिक उत्सवांना, व्रतांना जपण्याचे काम आदिवासी समाज आजही मनोभावे करत आहेत. डोंगरदेव हे आदिवासींचे अतिशय खडतर व तितकेच महत्वाचे व्रत मानले जाते. हे व्रत आदिवासींच्या विविध जमातींपैकी प्रामुख्याने कोकणा, कोकणी, महादेव कोळी, भिल्ल, वारली, पावरा, मावची आदी जमातीचे लोक मोठ्या प्रमाणात साजरे करतात.

वनसंपत्तीचे, गुरं ढोरांचे संरक्षण व्हावे, धनधान्य चांगले पिकून, संकटांपासुन मुक्ती व कौटुंबिक व सामाजीक सलोख्याचे वातावरण राहवे. याकरिता शेकडो वर्षांपासून डोंगरदेव उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. गोल रिंगण करून अखंड दिवा प्रज्वलीत करून नागली, भात, फळ, धान्य आहारामधे मक्याची कोंडी, राजिगरा, सुके डांगर, बिगर तेलाची उडीद दाळ, रात्री उडीद दाळ नागलीची व ज्वारीची भाकरी याचा समावेश असतो. रात्री कांबळ अंथरून रग पांघरून डोंगरदेव उत्सव स्थळ म्हणजेच मठ परिसरात निवारा करावा लागतो. पहाटे थंड पाण्याने आंघोळ करून पूजाविधी करून गावात ढोल पावरी या पारंपरिक वाद्याच्या तालावर फेर धरत नाचून भिक्षा मागून फक्त एकच वेळेस भोजन करण्यात येते.

हेही वाचा -अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिल्यास माझा विरोध नाही - छगन भुजबळ

डोंगरी देवाचे व्रत ठेवणाऱ्यांना माऊल्या असेही म्हटले जाते. पौर्णिमेच्या दिवशी पर्वतरांगातील गुहेमधे माऊल्या जातात, तत्पूर्वी गुहेतील जागा स्वच्छ करून गाईच्या शेणाने सारवून पूजाविधी करून तुपाचा दिवा लावण्यात येतो. नागली, तांदुळ, गव्हाच्या पिठाचा दिवा याला पुंजा म्हणतात. यानंतर फळांची मांडणी करण्यात येते व दह्याच्या हंडीचे पूजन करण्यात येते. रात्रभर पूजाविधी आटोपून उत्सवाची सांगता गुहेतुन बाहेर आल्यानंतर करण्यात येते. दरम्यान व्रत कालावधीत घरी प्रवेश करता येत नाही, पायात चप्पल घालता येते नाही, शिव ओलांडता येत नाही. उपवास ठेवावा लागतो भुतलावरील वनस्पती, प्राणी यांचे संरक्षण संवर्धन व्हावे मानवजातीचे कल्याण व्हावे असा हेतु डोंगरी देवाचे पूजन करण्यामागे असल्याचे आदिवासी बांधव सांगतात.

हेही वाचा -नाशकात जबरी लुटमारीसह खून करणारे सराईत गुन्हेगार चार तासात जेरबंद

Last Updated : Dec 9, 2019, 9:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details