दिंडोरी(नाशिक) - पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार गोरगरिबांना लॉक डाऊन काळात कोणीही उपाशी राहू नये म्हणून शासनाने प्रत्येक रेशन दुकानात प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ देण्याचे काम प्रत्येक तालुक्यातील खेडोपाडी चालू आहे.
दिंडोरी तालुक्यात कोरोणा विषाणुवर मात करण्यासाठी गोरगरिबांनी केले स्वेच्छेने दान
मुख्यमंत्री निधीसाठी आपल्या गावाचा खारीचा वाटा म्हणून मोफत धान्य वाटपाच्या वेळी स्वइच्छेने मुख्यमंत्री सहाय्यता निधी गोळा करुन दिंडोरीचे प्रांतधिकारी डॉ. संदीप आहेर यांच्याकडे सुपुर्द करण्याचा निर्णय घेतला.
दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील पिंपरी अंचला ग्रामपंचायतीने ग्रामस्थांशी विचारविनिमय केले. मुख्यमंत्री निधीसाठी आपल्या गावाचा खारीचा वाटा म्हणून मोफत धान्य वाटपाच्या वेळी स्वइच्छेने मुख्यमंत्री सहाय्यता निधी गोळा करुन दिंडोरीचे प्रांतधिकारी डॉ. संदीप आहेर यांच्याकडे सुपुर्द करण्याचा निर्णय घेतला. मोफत धान्य वाटप व मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रेशन दुकानातच दानपेटी ठेवून सोशल डिस्टंसींगचे पालन करून धान्य वाटपाचा गावातील ज्येष्ठ नागरीक आनंदराव चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.