नाशिक- मालेगाव शहरातील कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी नाशिक शहरात आणण्यास नाशिकच्या भाजपच्या लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. महापौर आणि भाजपच्या आमदारांनी आज जिल्हाधिकार्यांची भेट घेत मालेगावचे रुग्ण नाशिकला आणू नये, अशी मागणी केली.
मालेगावमधील कोरोनाग्रस्तांना उपचारासाठी नाशिकला आणू नका, भाजप आमदारांची मागणी - corona news in nashik
मालेगाव शहरातील कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी नाशिक शहरात आणण्यास नाशिकच्या भाजपच्या लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे.
मालेगाव शहरातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे मालेगावमध्ये उपचारासाठी रुग्णालय कमी पडू लागली आहेत. त्यामुळे मालेगावमधील अनेक कोरोनाबाधित रुग्णांना नाशिकमधील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केल जात आहे. मात्र, मालेगावमधील या कोरोनाबाधित रुग्णांमुळे नाशिक शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, अशी भीती नाशिकमधील भाजपच्या लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मालेगावमधील कोरोनाबाधितांना उपचारासाठी नाशिकमध्ये आणू नये, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, नाशिक शहरात मालेगावसारखा प्रादुर्भाव वाढला तर आतापर्यंत कंट्रोलमध्ये असलेले नाशिकसुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडेल. शिवाय नाशिकमध्ये यदा कदाचित भविष्यात गरज पडल्यास त्यांची व्यवस्था कुठे करणार? असा सवालही भाजप आमदार राहुल ढिकले यांनी उपस्थित केला आहे.