नाशिक -गिरणारे येथील गोंधळ झालेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षा केंद्राला जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी भेट देत पाहणी केली आहे. घडलेल्या प्रकाराबाबत आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल पाठवणार असून उघडलेल्या सीलबंद पेट्या आणि खासगी वाहनातून आलेल्या प्रश्नपत्रिका आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पेपर खासगी वाहनातून आले असले तरी पेपर फुटले नाही, असा दावा जिल्हाधिकारी मांढरे यांनी केला आहे.
'पेपर फुटला नसून उशिरा आल्याने गोंधळ'
पेपर फुटला नसून उशिरा आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांनी परिक्षेवर बहिष्कार टाकायला नको होता. न्यासा या खासगी कंपनीकडे परिक्षाची जबाबदारी असून त्यामुळे खासगी वाहनाने पेपर आलेत. याबाबत आरोग्याच्या वरिष्ठ विभागाकडे अहवाल पाठवणार आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करणार, अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.