महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संगमनेरमधील 70 महिलांना 'वॉटर व्हील्स'चे वाटप - Nashik latest news

होळीच्या निमत्तामने संगमनेर येथे रंगाची उधळण करुन महिलांना वॉटर व्हील्सचे वाटप करण्यात आले. वॉटर व्हील्सची श्रमता 7 हजार 500 किलोमीटर असल्यामुळे महिलांना आता डोक्यावरून पाणी आणावे लागणार नसल्याचे अजय देवरे यांनी सांगितले आहे.

Sangamner
संगमनेरमधील 70 महिलांना वॉटर व्हील्सचे वाटप

By

Published : Mar 10, 2020, 12:51 PM IST

नाशिक- युकेतील 'वेल्स ऑन व्हील्स' या सामाजिक संस्थेने दिंडोरी तालुक्यातील संगमनेरमध्ये 70 महिलांना वॉटर व्हील्सचे वाटप केले. तालुक्यातील अतिदुर्गम भागात महिलांना एक ते दीड किलोमीटरपर्यंत डोक्यावरून पाणी आणावे लागत होते. यावर पर्याय म्हणून महिलांना वॉटर व्हील्सचे वाटप करण्यात आले आहे.

संगमनेरमधील 70 महिलांना वॉटर व्हील्सचे वाटप

हेही वाचा -कोरोनाचा चिकन व्यवसायावर परिणाम; महिन्याभरात चिकन उद्योगाला 900 तर शेतकऱ्यांना 500 कोटींचा फटका

होळीच्या निमत्तामने संगमनेर येथे रंगाची उधळण करुन महिलांना वॉटर व्हील्सचे वाटप करण्यात आले. संगमनेर येथील शाळेतील 1 ली ते 4 थी पर्यंत विद्यार्थ्यांनी परदेशातील पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांना विविध शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. या वॉटर व्हील्सची श्रमता 7 हजार 500 किलोमीटर असल्यामुळे महिलांना आता डोक्यावरून पाणी आणावे लागणार नसल्याचे अजय देवरे यांनी सांगितले.

यावेळी अजय देवरे, ऋषीकेश पडवळ, युके मधील बॅडन सैम फॅबीओ, ख्रिस्तीन, अ‌ॅलक्स, निक, माहीर, ज्योयी हे सदस्य उपस्थित होते. तर पियुश काकुळते, भगवान जोपळे, शरद धादवड, अनूप, विजय, कमलेश, दिपक, स्वप्नील, विशाल, विधीत, रोहीत , ग्रामस्थ योगेश जाधव, निवृत्ती गायकवाड, रविंद्र ठाकरे, महादेव बागुल, जयराम चौधरी, बाळू बागुल, संतोष साबळे, गणेश चौधरी, पंढरीनाथ गायकवाड, बाळू चव्हाण आदी उपस्थित होते.

हेही वाचा -'कोरोना'चे प्रतिकात्मक दहन, नाशिककरांनी साजरी केली अनोखी होळी

ABOUT THE AUTHOR

...view details