महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गंगापूर धरणातून एक हजार क्यूसेक विसर्ग; दारणा, कश्यपी, आळंदीसह नांदूरमध्यमेश्वर धरण ओव्हरफ्लो - दारणा, कश्यपी, आळंदी, नांदूरमध्यमेश्वर धरण

शनिवारी पावसाचा जोर बघता सायंकाळी एक हजार क्यूसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा गोदापात्र दुथडी भरुन वाहत होते. तसेच दारणा धरणातून ११००, कश्यपीतून १५०, आळंदीतून ८० तर नांदूरमध्यमेश्वरमधून ५ हजार ५७६ क्यूसेक वेगाने विसर्ग सुरु आहे. पावसाची संततधार कायम राहिल्यास विसर्गात वाढ होण्याची चिन्हे आहेत.

गंगापूर धरण
गंगापूर धरण

By

Published : Oct 10, 2021, 12:30 PM IST

नाशिक - गंगापूर धरण परिसरात पावसाची संततधारेमुळे शनिवारी ‌धरणातुन सायंकाळी सहा वाजता एक हजार क्यूसेक विसर्ग सोडण्यात आला. गंगापूर धरण अगोदरच शंभर टक्के भरले असून खबरदारी म्हणून विसर्ग करण्यात आला. तसेच दारणा, कश्यपी,आळंदीसह नांदूरमध्यमेश्वर धरणातून विसर्ग आहे. गंगापूर धरणातून पाणी सोडल्याने गोदापात्र दुथडी भरुन वाहत आहे. पावसाची संततधार कायम राहिल्यास विसर्गात वाढ होण्याची चिन्हे आहे.

अनेक ठिकाणी पाऊस -

मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून राज्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यात मागील एक दोन दिवसांपासून दिंडोरी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. शनिवारी सकाळपासून गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु होती. गंगापूर धरण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच शंभर टक्के भरुन ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग केला जात आहे.

नदीपात्रात सोडले पाणी -

शनिवारी पावसाचा जोर बघता सायंकाळी एक हजार क्यूसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा गोदापात्र दुथडी भरुन वाहत होते. तसेच दारणा धरणातून ११००, कश्यपीतून १५०, आळंदीतून ८० तर नांदूरमध्यमेश्वरमधून ५ हजार ५७६ क्यूसेक वेगाने विसर्ग सुरु आहे. पावसाची संततधार कायम राहिल्यास विसर्गात वाढ होण्याची चिन्हे आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details