नाशिक -येथे होणाऱ्या साहित्य संमेलनापुर्वी संमेलनाच्या निधीचा वाद चांगलाच चिघळला आहे. एकीकडे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी हे संमेलन आपलेच असल्याने सर्व आमदार आणि नगरसेवकांनी आपला निधी संमेलनाला देण्याच्या सुचना केल्या आहेत. तर दुसरीकडे महापालिकेत सत्ताधारी भाजपाने मात्र तिजोरीत खडखडाट असल्याचे कारण देत एवढा निधी देता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पालकमंत्री विरुद्ध भाजप असा वाद निर्माण झाला आहे.
पैसे मागणं आमचं काम, ज्यांना जे द्यायचं ते देतील -
नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. संमेलनासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आमदारांना 10 लाखांचा निधी देण्याचे आवाहन केले आहे. मात्र, भाजपाने भुजबळांच्या या मागणीला फारसा प्रतिसाद दिलेला नाही. यावरुन "पैसे मागणं आमचं काम आहे, ज्यांना जे द्यायचं ते देतील" अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.
20 ते 25 लाखांचा निधी देण्याचा प्रयत्न -