नाशिक- बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथील उद्धव महाराज समाधी मंदिरात दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी 5 हजार पेक्षा अधिक दिव्यांच्या प्रकाशात संपूर्ण मंदिर परिसर न्हाऊन निघाला होता. या दीपोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे.
बागलाणमध्ये उद्धव महाराज समाधी मंदिरात दीपोत्सव - नाशिकमध्ये दिपोत्सव
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर या प्रकाशोत्सवाचे आयोजन करण्यात येते. संपूर्ण गाव व परिसरातील भाविक स्वयंस्फूर्तीने या नेत्रदिपक सोहळ्यात सहभागी होतात.
बागलाणमध्ये उद्धव महाराज समाधी मंदिरात दीपोत्सव
हेही वाचा - परतीच्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर या प्रकाशोत्सवाचे आयोजन करण्यात येते. संपूर्ण गाव व परिसरातील भाविक स्वयंस्फूर्तीने या नेत्रदिपक सोहळ्यात सहभागी होतात. उद्धव महाराज समाधी, रघुराज महाराज समाधी व मंदिर परिसरात आकर्षक दिव्यांची आरास, रांगोळ्या व फुलांची सजावट करण्यात आली आहे.