महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात पिकाला नाही भाव.. शेतकऱ्यांवर परराज्यात जाण्याची वेळ - कोबी शेती नाशिक

दिंडोरी तालुक्यातील अंबानेर शिवारातील शेतकरी अरुण दुगजे यांनी २५ गुठ्यात कोबी पिकाची लावगड केली. आपल्या राज्यातील बाजारात कोबीला योग्य भाव मिळत नसल्याने त्यांना याची विक्री बाहेरराज्यात जाऊन केली आहे.

dindori-village-farmer-sell-cauliflower-in-gujarat
शेतकरी अरुण दुगजे

By

Published : Jun 10, 2020, 3:35 PM IST

दिंडोरी(नाशिक) - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून त्यामुळे लावण्यात आलेल्या लाॅकडाऊनने अनेक निर्बंध आले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. बाजारात ग्राहक नसल्याने भाजीपाल्याला भाव मिळत नाही. मेहनीतीने जोपासलेला भाजीपाला शेतकऱ्यांना कवडीमोल दराने विकावा लागत आहे.

शेतकरी अरुण दुगजे

दिंडोरी तालुक्यात एप्रिल व मे महिन्यात कोथिंबीर, कोबी, हिरवी मिरची, कारले, दोडके व दुधी भोपळा अशी पिके घेतली जातात. परंतु, यावर्षी कोरोना संकटाने बाजारात भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला गुजरात येथील सुरतमध्ये पाठवण्यास सुरूवात केली आहे.

दिंडोरी तालुक्यातील अंबानेर शिवारातील शेतकरी अरुण दुगजे यांनी २५ गुठ्यात कोबी पिकाची लावगड केली. आपल्या राज्यातील बाजारात कोबीला योग्य भाव मिळत नसल्याने त्यांना याची विक्री बाहेरराज्यात जाऊन केली आहे. यात त्यांना चांगला नफा मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details