महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिंडोरी तालुक्यात पुन्हा ९ कोरोना पॉझिटिव्ह, तर 3 नवीन कन्टेन्मेंट झोन - दिंडोरी कोरोना न्यूज

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात 9 रुग्ण नव्याने पॉझिटिव्ह आढळल्याने कोरोना ग्रामीण भागात पसरत चालल्याचे स्पष्ट होत आहे. आज दिंडोरी तालुक्यात नवीन ३ कन्टेन्मेंट झोन करण्यात आल्याची माहिती तालुका वैदयकिय अधिकारी यांनी दिली आहे.

dindori-taluka-again-9-positive
दिंडोरी तालुक्यात पुन्हा ९ पॉझिटीव्ह

By

Published : Aug 7, 2020, 3:56 PM IST

दिंडोरी ( नाशिक ) -तालुक्यात 9 रुग्ण नव्याने पॉझिटिव्ह आढळल्याने कोरोना ग्रामीण भागात पसरत चालल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने चिंता व्यक्त होत आहे. दिंडोरी तालुक्यात 9 करोनाबाधित आढळले. गेल्या काही दिवसात कोरोनाची साखळी तुटल्याचे दिसून येत होते. परंतु आज आढळलेल्या रुग्णांमुळे कोरोना ग्रामीण भागात पसरलेला दिसत आहे.

आजचे खासगी अहवाल तसेच बोपेगाव केंद्रातून पाठवलेले सँपल्समधील पॉझिटिव्ह रुग्ण खालीलप्रमाणे आहेत.

  • दिंडोरी नगरपंचायत हर्दीतील टेलिफोन कॉलनी 1 - सहा वर्षीय मुलगा, वरखेडा, इंदिरा गल्ली
  • 1- पुरुष , 36 वर्षीय बाधीत व्यक्ती संपर्कातील
  • 1- महीला, 16 वर्षीय, बाधीत व्यक्ती संपर्कातील
  • 1- महीला, 25 वर्षीय
  • 1- मुलगा, 8 वर्षीय वरील चौघे एकाच कुटूबांतील आहेत.
  • मडकीजांब 1- पुरुष , 50 वर्षीय,
  • खडक सूकेणे 1 पुरुष, 50 वर्षीय, नवीन पॉझिटिव्ह. नवीन कंटाइन्मेंट झोन लागेल
  • करंजवण 1 पुरुष 63 वर्षीय, नवीन पॉझिटिव्ह. तेथे नवीन कंटाइन्मेंट झोन करावे लागेल
  • दिंडोरी नगरपंचयात, लक्ष्मी अपार्टमेंट १ पुरुष नवीन कंटाइन्मेंट झोन लागेल.

हेही वाचा -कोरोनाबाधितांची संख्या २० लाखांच्या पार ; गेल्या 24 तासांत 62 हजार 538 नव्या रुग्णांची नोंद

आज नवीन दिंडोरी तालुक्यात नवीन ३ कन्टेन्मेंट झोन करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी दिली .

ABOUT THE AUTHOR

...view details