नाशिक- कोरोनासह बदलत्या वातावरणमुळे सध्या साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या आपल्याला आपली काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या खाण्या-पिण्यात बदल करून निरोगी राहता येते, असे आहारतज्ज्ञ डॉ. रणजीता चौबे-शर्मा यांनी सांगितले.
सध्या वाढत असलेल्या साथरोगाच्या रुग्णामुळे आपण आहारात बदल करून करून कसे निरोगी राहू शकतो, याबाबत डॉ. चौबे-शर्मा यांनी 'ईटीव्ही भारत'ला खास मुलाखत दिली. यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या रोजच्या दिनचर्यामध्ये सकाळी उठल्यावर प्रत्येकाने कोमट पाणी पिले पाहिजे. यानंतर काही वेळाने योगा प्राणायाम किंवा व्यायाम केल्यास त्याचा अधिक फायदा होतो. चहा घेत असाल तर हा आयुर्वेदिक चहा असावा. यात आले, पुदिना, लवंग, वेलची, दलिजी, गुळ, असा मसाल्याचा वापर करावा.