नाशिक -भारतीयांमध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचं प्रमाण प्रचंड वाढले आहे. भारतात दरवर्षी दहा लाखांहून अधिक लोकांचा मधुमेहामुळे मृत्यू होत आहे. गेल्या 29 वर्षात मधुमेह हा भारतात मृत्यूचं सातवं कारण ठरला आहे. भारतात प्रत्येक 12 व्यक्ती मागे 1 जण मधुमेहाचा शिकार आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भारत हा मधुमेहाची राजधानी होण्यास वेळ लागणार नाही.
जगात भारताचा मधुमेहाच्या रुग्णांमध्ये दुसरा क्रमांक आहे. इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशनच्या 2017 च्या अहवालानुसार जगभरात मधुमेहाचे 7 कोटी रुग्ण आढळून आले असून 2034 पर्यंत 13 कोटीहून अधिक मधुमेह रुग्णांची संख्या होईल, अशी शक्यता वर्तवली जातेय. रुग्णांनी आपली मधुमेहाची पातळी एक टक्क्यांनी कमी केली तरी मधुमेह नियंत्रणात राहू शकतो.
मधुमेह कसा होतो?
रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा वाढणे म्हणजेच मधुमेह. आपण जे अन्न खातो, त्याचे शरीराला आवश्यक ऊर्जेसाठी साखरेत (ग्लूकोज) मध्ये रूपांतर होते. आपल्या जठराजवळ असणाऱ्या पॅनक्रियाज या अवयातून पाझरणाऱ्या इन्शुलिन या हार्मोनियममुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशीत सामावण्याची प्रक्रिया घडत असते. मधुमेह झालेल्या व्यक्तीत इन्शुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते. हव्या त्या प्रमाणात इन्शुलिन तयार न झाल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. मधुमेहामुळे अंधत्व, हृदयविकार किंवा मूत्राशयाचे विकार उद्भवू शकतात.
मधुमेहाची लक्षणे -