नाशिक - दिंडोरी तालूक्यातील ढकांबे ग्रामस्थांनी हनुमान जयंती उत्सवाचा खर्च कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा केला आहे. नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन कोरोनासारख्या महामारीवर प्रतिबंध करण्यासाठी सढळ हाताने मदत करावी असा संदेशही दिला आहे.
दिंडोरी तालुक्यात कोरोनाशी लढण्यासाठी ढकांबे ग्रामस्थांकडून ५१ हजाराचा निधी प्रांतकडे सुपूर्द - corona in maharashtra
दिंडोरी तालूक्यातील ढकांबे येथील ग्रामस्थांनी सालाबादप्रमाणे हनुमान जयंती उत्सवात होणाऱ्या खर्चाला फाटा देत पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी 51 हजार रुपयांचा धनादेश दिंडोरी तालुक्याचे प्रांताधिकारी डॉ. संदिप आहेर यांच्याकडे सुपूर्द करून आदर्शवत कार्य केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, प्रतिबंधक उपाय योजनासाठी केंद्र व राज्य शासनस्तरावर, सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये उभारण्यात येणाऱ्या मदतनिधीमध्ये आपलाही खारीचा वाटा जमा व्हावा. या उदात्त हेतूने दिंडोरी तालूक्यातील ढकांबे येथील ग्रामस्थांनी सालाबादप्रमाणे हनुमान जयंती उत्सवात होणाऱ्या खर्चाला फाटा देत पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी 51 हजार रुपयांचा धनादेश दिंडोरी तालुक्याचे प्रांताधिकारी डॉ. संदिप आहेर यांच्याकडे सुपूर्द करून आदर्शवत कार्य केले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत अनेक स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, विविध सामाजिक उपक्रमातून कोरोनावर प्रतिबंध करण्यासाठी आणि मदतीसाठी पुढे येत असून, अर्थसहाय्य करून मदतीचा हात पुढे करत आहेत. याकामात ग्रामीण भागातील नागरिकदेखील पुढे आले असल्याचे ढकांबे वासियांनी दाखवून दिले आहे.