नाशिक- येथील चौधरी यात्रा कंपनीमार्फत काश्मीर येथील अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या भाविकांनी अमरनाथचे दर्शन घेतले आहे. त्यानंतर ते परतीच्या प्रवासाला निघत असल्याची माहिती चौधरी यात्रा कंपनीचे व्यवस्थापक सीताराम चौधरी यांनी कश्मीर येथून दिली आहे.
नाशिकहून अमरनाथ यात्रेसाठी गेलेले भाविक दर्शन करून परतीच्या प्रवासाला - darshan
दहशतवादी अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याचा कट आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेली आहे. त्यामुळे यात्रेकरूंच्या सुरक्षेच्यादृष्टीने अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. या आशयाचे पत्र जम्मू-काश्मीर सरकारने जारी केले आहे. यात्रेकरूंना लवकरात लवकर परतण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
नाशिकच्या चौधरी यात्रा कंपनीमार्फत नाशिक, सोलापूर आणि अकोला येथून 16 भाविक 25 जुलैला नाशिकहून निघाले होते. त्यांनी 29 तारखेला अमरनाथचे दर्शन करून 3 आॅगस्टला सकाळी जम्मू येथून परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. सर्व प्रवासी सुखरूप असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच याआधी 10 दिवसापूर्वी 20 भाविक अमरनाथ यात्रा पूर्ण करून आले असल्याचेही चौधरी यात्रा कंपनीमार्फत सांगण्यात आले आहे.
दहशतवादी अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याचा कट आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेली आहे. त्यामुळे यात्रेकरूंच्या सुरक्षेच्यादृष्टीने अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. या आशयाचे पत्र जम्मू-काश्मीर सरकारने जारी केले आहे. यात्रेकरूंना लवकरात लवकर परतण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.