नाशिक - श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. यंदाच्या श्रावण महिन्यातील अखेरचा सोमवार असल्याने नाशिकसह राज्यभरातील भाविकांनी त्रंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी गर्दी केली आहे.
शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी - श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर
आज चौथ्या व अखेरच्या श्रावण सोमवारी भाविकांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात आज पहाटेपासूनच महाभिषेक, श्रावणी अभिषेक अशा पूजा अर्चा सुरू असल्याने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून निघाला आहे.
श्रावण महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सुरुवातीचे तीन सोमवार त्रंबकेश्वरमध्ये अपेक्षित गर्दी झाली नव्हती. मात्र, आज चौथ्या व अखेरच्या श्रावण सोमवारी भाविकांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळाले.