नाशिक- जिल्ह्यातील वणी येथील आद्यपीठ संबोधल्या जाणाऱ्या सप्तश्रृंगी गडावर आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला भाविकांनी गर्दी केली असून सुर्योदय सप्तश्रृंगी मातेच्या साक्षीने पाहिला.
नववर्षी काही लोक विविध ठिकाणी आनंद साजरा करण्यासाठी जात असतात. तर काही लोक देवाकडे प्रार्थना करण्यासाठी विविध मंदिरात जातात. नविन वर्ष सर्वांना सुख-सोयी समृद्ध, आरोग्यमय जावो यासाठी अनेक भाविक सप्तश्रृंगी गडावर जाऊन देवीसमोर नतमस्तक होऊन प्रार्थना करतात.