महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होतील' - maharashtra assembly elections 2019

युतीच्या जागा वाटपात आरपीआय ला 10 जागांची अपेक्षा होती. उत्तर महाराष्ट्रात देखील पक्षाला एकही जागा मिळलेली नाही. यावर आपण नाराज असल्याचे आठवले म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीचे सरकार आल्यावर कॅबिनेट मंत्रीपद आणि महामंडळात जागा देण्याचे आश्वासन दिले असल्याचे आठवले यांनी यवेळी स्पष्ट केले आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले

By

Published : Oct 5, 2019, 7:24 PM IST

नाशिक - 'पुन्हा एकदा राज्यात युतीची सत्ता येईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरे होतील' असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. केंद्र सरकारला बहुमत मिळाल्यानंतर जम्मू-कश्मीर येथील 370 कलम हटवण्यात आले. या कलमाला बाबासाहेब आंबेडकरांचादेखील विरोध होता. ह्या निर्णयाचा फायदा महाराष्ट्रातील निवडणुकीत युती सरकारला होणार असून युतीला 240 ते 250 जागा मिळतील असेही त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले

युतीच्या जागा वाटपात आरपीआयला 10 जागांची अपेक्षा होती. उत्तर महाराष्ट्रदेखील पक्षाला एकही जागा मिळलेली नाही. यावर आपण नाराज असल्याचे आठवले म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीचे सरकार आल्यावर कॅबिनेट मंत्रीपद आणि महामंडळात जागा देण्याचे आश्वासन दिले असल्याचे आठवले यांनी यवेळी स्पष्ट केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असताना मिळाला नाही तेवढा वाटा आता आम्हाला युतीत राहून मिळतोय असेही आठवले म्हणाले.

हेही वाचा -येवल्यातून शक्तीप्रदर्शन करत छगन भुजबळांचा उमेदवारी अर्ज दाखल

येत्या निवडणुकीत आरपीआय मित्रपक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. बंडखोरांनी पक्षाचे काम करावे. आता संधी मिळाली नाही, तरी नंतर नक्कीच मिळेल, असे आवाहनही त्यांनी केले आहे. आरेच्या वृक्षतोडीबद्दल बोलताना ते म्हणाले, जंगल तोडू नये असे माझे मत आहे. मात्र, जेवढी झाडे तोडली त्यापेक्षा जास्त झाडे लावली जातील. डेव्हलपमेंटच्या वेळी लोकांनी विरोध करू नये.

ABOUT THE AUTHOR

...view details