नाशिक - देवळाली मतदार संघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांचा विवाह सोहळा नाशिक तालुक्यातील अलास्का बँक्वेट हॉलमध्ये आज पार पडला. डॉक्टर प्रविण वाघ यांच्यासोबत त्या विवाहबंधनात अडकल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या मंडळींना विवाहाचे निमंत्रण देण्यात आले होते. या सोहळ्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांची उपस्थिती होती.
देवळालीच्या आमदार सरोज आहिरे अडकल्या विवाहबंधनात - Nashik District Latest News
देवळाली मतदार संघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांचा विवाह सोहळा नाशिक तालुक्यातील अलास्का बँक्वेट हॉलमध्ये आज पार पडला. डॉक्टर प्रविण वाघ यांच्यासोबत त्या विवाहबंधनात अडकल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या मंडळींना विवाहाचे निमंत्रण देण्यात आले होते.
साध्या पद्धतीने विवाह सोहळा संपन्न
देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे व नाशिक मधील दंतरोगतज्ञ डॉ. प्रवीण वाघ यांचा विवाह सोहळा रविवारी नाशिक येथे पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित राहून वधू वरांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कृषी मंत्री दादा भुसे यांची देखील उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने व मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा पार पडला.