नाशिक -राज्यासह नाशिक जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत असून रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी धावपळ होत आहे. अशात नाशिकला रेमडेसिवीरचा जास्तीत जास्त स्टॉक कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सागितले.
नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या झपाट्याने वाढत असून रोज 5 ते 6 हजार नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असून आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. एकीकडे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे, तर दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने अडचणीत भर पडली आहे. नाशिक जिल्ह्यासाठी 6 हजार रुग्णांसाठी 35 हजार रेमडेसिवीरची गरज असताना केवळ 6 हजार इंजेक्शन उपलब्ध झाले असून नाशिकला रेमडेसिवीर जास्तीत जास्त स्टॉक मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
हा वितरणाचा दोष नाही पुरवठ्याचा आहे -
नाशिकसाठी 35 हजार रेमडेसिवीरची मागणी, पुरवठा मात्र सात हजार देखील नाही - जिल्हाधिकारी - रेमडेसिवीर इंजेक्शन
राज्यासह नाशिक जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत असून रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी धावपळ होत आहे. अशात नाशिकला रेमडेसिवीरचा जास्तीत जास्त स्टॉक कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सागितले.
राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यात देखील रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल मिळून 6 हजार रुग्णांसाठी आमच्याकडे 35 हजार रेमडेसिवीर मागणी केली आहे. मात्र आमच्याकडे आतापर्यंत 7 हजार पेक्षा अधिक रेमडेसिवीर प्राप्त झाले नाहीत. हा आमच्या यंत्रणेचा किंवा वितरणाचा दोष नसून हा पुरवठ्याचा दोष असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी म्हटले आहे. तरी देखील आम्ही नाशिकसाठी जास्तीत जास्त स्टॉक कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करत आहे. रेमडेसिवीर हे गरजू रूग्णांपर्यंत पोहचावे यासाठी आम्ही 24 पथके तयार केली असून ते कंपनीमधून आलेला स्टॉक आमच्या सिस्टीममध्ये कसा येईल यासाठी हे पथक काम करणारा आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये देखील भरारी पथकांची नेमणूक केली असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.