नाशिक -15 दिवसांत 2 लाखांवरील कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे. याबाबत कॅबिनेटला लवकरच अहवाल सादर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उत्तर महाराष्ट्राच्या जिल्हानिहाय कृषी विभागाच्या शुक्रवारी आढावा बैठका आयोजीत करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
'२ लाखांवरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांबाबत 15 दिवसांत निर्णय घेणार'
15 दिवसांत 2 लाखांवरील कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे. याबाबत कॅबिनेटला लवकरच अहवाल सादर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा -
सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या दोन चोरट्यांना नाशिक पोलिसांनी केले जेरबंद
मंत्री भुसे म्हणाले की, अवकाळीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याचेही भुसे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पीक विम्यासंदर्भात संबंधित कंपन्यांना पीक विम्याचे पैसे 15 दिवसांच्या आत जमा करण्याच्या सुचना केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी शेतकरी चिंतामुक्त झाला पाहिजे यासाठी राज्यभर बैठका घेणार असल्याचेही ते म्हणाले. कांद्याचा प्रश्न गंभीर असून याप्रश्नी केंद्र सरकारला निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी केली आहे. तसेच कोरोना व्हायरस बाबत नागरिकांनी, पोल्ट्री व्यावसायिकांनी भीती बाळगू नये. दरम्यान, उत्तर महाराष्ट्राच्या जिल्हानिहाय कृषी विभागाची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.