नाशिक - जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातील नगराध्यक्ष निवडणुकीपूर्वी एक धक्कादायक घटना घडली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी सहलीत गेलेल्या भाजप नगरसेविकेचा मृत्यू झाला. ( Woman Corporator Death Nashik ) मुक्कामी असलेल्या हाॅटेलमध्ये नगरसेविकेला आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. भाजपची सहल नगरसेविकेच्या जीवावर बेतल्याची चर्चा रंगली आहे.
सत्तेचे राजकारण पुन्हा एकदा वादात -
सुरगाणा नगरपंचायतीत वार्ड क्रमांक १६ मधून नगरसेविका काशीबाई पवार निवडून आल्या होत्या. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकी अगोदर दगाफटका नको म्हणून भाजपने नगरसेवकांची सहल काढली होती. निवडणुकीच्या ऐनवेळी अगोदर येऊन बहुमत जाहीर करण्याचा भाजपचा कल होता. मात्र, वापी येथे एका हॉटेलमध्ये थांबले असताना नगरसेविका काशीबाई पवार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. खुर्चीच्या राजकारणात नगरसेविकेला काळाने गाठल्याने भाजपचे सत्तेचे राजकारण पुन्हा एकदा वादात सापडले आहे.