नाशिक - कोरोना व्हायरसचा उद्रेक भारतात मोठ्या प्रमाणावर झाला असून महाराष्ट्राला या व्हायरसचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, नाशिकमधील मालेगाव येथे आयसोलेशन कक्षात असलेल्या एका कोरोना संशयिताच्या मृत्युने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील हा पहिलाचा कोरोना संशयिताचा मृत्यू असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. मात्र, या संशयिताचा तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
मालेगाव येथे एका कोरोना संशयिताचा मृत्यू, अहवाल अद्याप प्रलंबित
सदर ५५ वर्षीय संशयित येथील सामान्य रूग्णालयातील कक्षात दाखल होता. त्याला सर्दी, खोकला व दम्याचा त्रास होता. आज सकाळी उपचार सुरू असताना त्याचे निधन झाल्याचे रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाँ. किशोर डांगे यांनी सांगितले.
मालेगाव येथे एका कोरोना संशयिताचा मृत्यू, अहवाल अद्याप प्रलंबित
सदर ५५ वर्षीय संशयित येथील सामान्य रूग्णालयातील कक्षात दाखल होता. त्याला सर्दी, खोकला व दम्याचा त्रास होता. आज सकाळी उपचार सुरू असताना त्याचे निधन झाल्याचे रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. किशोर डांगे यांनी सांगितले. या संशयिताचे स्वॅब तपासणीसाठी पाठवलेले आहेत. मात्र, अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही. रात्री उशिरापर्यंत यासंबधी अहवाल मिळण्याची शक्यता आहे.