नाशिक -शहरात कोरोनामुळे आतापर्यंत 1822 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद महानगरपालिका दप्तरी करण्यात आली असून, या मृत्यूंपैकी 1670 जणांचे डेथ ऑडिट करण्यात आलं आहे. यातील बहुतांश जणांचा मृत्यू कोरोनामुळे झालेल्या न्युमोनिया आणि लग्स फायब्रोसिसमुळे झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यातील अनेक जणांना मधुमेह आणि अति उच्च रक्तदाबाचा आजार असल्याचे देखील समोर आले आहे.
'न्युमोनिया ठरतो घातक'
कोरोनाचे तीव्र लक्षणे असून सुद्धा रुग्णांनी वेळेवर उपचार घेतले नाही तर कोरोना बळावतो, त्यामुळे रुग्णाला न्युमोनिया होतो. अशात रुग्णाच्या शरीराने औषध उपचाराला प्रतिसाद दिला नाही तर रुग्णांची प्रकृती चिंताजनक होते. त्याला लग्स फायब्रोसिस आजाराचा सामना करावा लागतो. रुग्णांला श्वास घेण्यास अति त्रास जाणवू लागल्यानंतर त्याला व्हेंटिलेटच्या साह्याने ऑक्सिजन देण्यात येतो. मात्र असे रुग्ण वाचण्याची शक्यता जवळपास 95 टक्के कमी असते, असं तज्ज्ञ सांगतात.