नाशिक - काम देण्याच्या बहाण्याने दोघा अज्ञात व्यक्तींनी सिडको येथील एका मूकबधिर युवकावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. भद्रकाली परिसरातील एका लॉजमध्ये हा धक्कादायक प्रकार झाला. अत्याचाराच्या घटनेनंतर युवकाची प्रकृती बिघडल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पीडित मुलाच्या भावाने भद्रकाली पोलीस ठाण्यात दोघा आरोपींविरूद्ध तक्रार दाखल केली.
धक्कादायक..! नाशिकमध्ये मूकबधिर युवकावर लॉजमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार - मूकबधिर युवकावर लैंगिक अत्याचार
सिडको परिसरातील बुरकुले हॉल भागातून या मूकबधिर युवकाचे दोघा संशयितांनी अपहरण केले. त्यानंतर त्याला दुचाकीवरून भद्रकाली परिसरातील एका लॉजवर नेऊन त्याच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
सिडको परिसरातील बुरकुले हॉल भागातून या मूकबधिर युवकाचे दोघा संशयितांनी अपहरण केले होते. त्यानंतर त्याला दुचाकीवरून भद्रकाली परिसरातील एका लॉजवर नेऊन त्याच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
हेही वाचा - धक्कादायक..! भिवंडीत ३१ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार
यापूर्वी देखील काही रिक्षाचालकांनी रात्रीच्या वेळी परराज्यातील एका युवकाला तपोवन भागातील अज्ञातस्थळी नेऊन अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना घडली होती. पुन्हा एकदा अशीच घटना घडल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.