महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशकात पिण्याच्या व्हॉल्वमध्ये आढळली मेलेली डुकराची पिल्ले - nifad news

उगाव रोड लगत असणाऱ्या कॉलनीमध्ये निफाड नगरपंचयतीचा पाणी सोडण्याचा व्हॉल्व आहे. यामध्ये रविवारी रात्री डुकराची पिल्ले पडलेली दिसली. नागरिकांनी फोन केल्यानंतर सोमवारी सकाळी ही पिल्ले घंटा गाडीत नेण्यात आली.

पिण्याच्या व्हॉल्वमध्ये आढळली मेलेली डुकराची पिल्ले

By

Published : Nov 5, 2019, 11:29 PM IST

नाशिक - निफाड नगरपंचायतीच्या प्रशासनाच्या उदासीनपणामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. उगाव रोड येथील संत जनार्दन स्वामी नगरातील पिण्याचे पाणी सोडणाऱ्या व्हॉल्वमध्ये डुकराची 7 ते 8 मेलेली पिल्ले पडून होती. शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढलेली असतानाही नगरपंचायत प्रशासन आरोग्य व स्वच्छता व्यवस्थेकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे सामूहिक आजाराच्या केसेस वाढल्यावर प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा-...अन्यथा 11 नोव्हेंबर पासून राज्यभर चक्काजाम - आमदार भुयार

उगाव रोड लगत असणाऱ्या कॉलनीमध्ये निफाड नगरपंचयतीचा पाणी सोडण्याचा व्हॉल्व आहे. यामध्ये रविवारी रात्री डुकराची पिल्ले पडलेली दिसली. नागरिकांनी फोन केल्यानंतर सोमवारी सकाळी ही पिल्ले घंटा गाडीत नेण्यात आली. या व्हॉल्वमधून या परिसराला पाणी सोडले जाते हा व्हॉल्व लीक असल्याचे येथील रहीवाशांनी सांगितले. नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी यांचे निफाड शहरातील आरोग्य, स्वच्छता व्यवस्थेकडे सफशेल दुर्लक्ष आहे. एका बाजूला निफाड नगरपंचायत सरकारच्या स्वच्छता अभियान स्पर्धेत भाग घेतला असल्याचा डांगोरा पिटत आहे. मात्र, प्रत्यक्षात अतिशय दयनीय परिस्थिती आहे.

हेही वाचा-जीडीपीची आकेडवारी निश्चित करण्यात सरकार 'हा' मोठा बदल करणार

संपूर्ण निफाड शहरात अशी एक हि गल्ली शिल्लक राहिली नाही तिथे डुकरं नाही. तसेच भाजीपाला मार्केटमध्ये तर अक्षरशः थेट भाज्या विकणाऱ्या लोकांमध्ये व भाज्या घेणाऱ्या गर्दीत ही डुकरे घुसतात. कधी-कधी तर भाज्या हि ओरबाडून पिशवी सह घेऊन जातात. हि डुकरे भाजी मार्केटमध्ये फिरताना गटारींने माखलेले असतात. नगरपंचायतील नागरिकांनी व नगरसेवक यांनी वेळोवेळी सांगून ही ठोस पाऊलं उचलले नाही. आता ज्या ठिकाणी व्हॉल्व आहे तिथे पूर्वी खड्डा होता. या खड्ड्यात लोक पडायचे म्हणून नागरिकांच्या मागणीनंतर येथे सिमेंट काँक्रीटचा चेंबर बनवला. तो जमिनीपासून उंच करावा, अशी मागणी असून जमिनीलगत ठेवला. शिवाय त्याला जाळी टाकली नाही. त्यामुळे कुत्रे, डुकरे त्यात पडतात. पावसाचे पाणी व्हॉल्व मधून थेट पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details