नाशिक -दारणा धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे धरण 80 टक्के भरले आहे. तर दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आज सकाळी 8 वाजता या धरणातून 3196 क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या परिस्थितीमुळे दारणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक : दारणा धरणातून 3196 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू; काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
दारणा धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे धरण 80 टक्के भरले आहे. तर दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आज सकाळी 8 वाजता या धरणातून 3196 क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
दारणा धरणातून 3196 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू
कुठले मोठे धरणं किती भरले -
- गंगापूर-59
- दारणा- 80
- करंजवण-9
- मुकणे-41
- कडवा-29
- चणकापूर-15
- गिरणा-37
नाशिक जिल्ह्यात लहान मोठी एकूण 24 आहेत. या धरणांत एकूण 41 टक्के पाणीसाठा आहे.
Last Updated : Jul 26, 2021, 2:10 PM IST