नाशिक Ayodhya Ram MandirNews:अयोध्येतील रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी (Ram Mandir Inauguration) होणाऱ्या कार्यक्रमात नाशिकच्या कीर्ती कलामंदिरच्या (Kirti Kala Mandir Nashik) नृत्यांगनांना विशेष निमंत्रित करण्यात आलं आहे. हा आनंदोउत्सव सोहळा असल्याने, नाशिकच्या कलाकार कथकमधून या सोहळ्यात राम-सीता यांचा विवाहोत्सव सादर (Ram Sita Marriage Performance) करणार आहेत. या सोहळ्यात नृत्य सादरीकरणाचा मान मिळाल्याने, हा नाशिककरांसाठी आनंदाचा क्षण असल्याचं नृत्यगुरु रेखा नाडागौडा यांनी सांगितलंय.
16 जानेवारीला होणार सादरीकरण : 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लांची प्रतिष्ठापना होत आहे. या निमित्ताने 16 ते 21 जानेवारीपर्यंत रामकथा, हनुमान महायज्ञ, अमृत महोत्सव या विशेष महोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी नाशिकच्या कीर्ती कलामंदिरच्या नृत्यांगना अयोध्येत येत्या 16 जानेवारी रोजी सादरीकरण करणार आहेत. यासाठी पाऊण तासांच्या कार्यक्रमात नाशिकच्या नृत्यांगनांना वेळ देण्यात आला आहे. यावेळी श्री रामवंदना, रामसीता विवाहोत्सव आणि भजमन रामचरण सुखदाची या भजनावर नृत्य प्रस्तुती करणार आहे.