नाशिक (लालसलगाव) - रोज होणाऱ्या या मुसळधार पावसाचा फटका द्राक्ष पिकालाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षाच्या बागा आहेत. मात्र, या बागांना पावसाचा तडाखा बसल्याने बागांचे पुर्णपणे नुकसान झाले आहे. त्यामुळे आम्हाला सरकारने मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान, येथील नुकसानीचा ईटीव्ही भारत'ने आढावा घेतला आहे.
द्राक्ष उत्पादकांना पावसाचा फटका, डाऊनीसह भुरी रोगाचा प्रादुर्भाव; ईटीव्ही भारत'कडून आढावा डाऊनी, भुरी रोगाचा प्रादुर्भाव
निफाड तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र आहे. या पावसाचा फटका आता तालुक्यातील लासलगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसताना दिसत आहे. द्राक्ष बागांमध्ये पाणी साचल्यामुळे द्राक्षबागांवर आता डाऊनी, भुरी रोगाचा प्रादुर्भाव पडण्याची दाट शक्यता आहे. या रोगामुळे द्राक्ष हंगामावर मोठा परिणाम होऊ शकतो. आगोदरच कोरोनामुळे द्राक्षे विक्रीला फटका बसलेला असताना, आता या अतिवृष्टीमुळे परत एकदा नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.
हेही वाचा -राज्यातील नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू - कृषीमंत्री दादा भुसे