नाशिक - वाडगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी वामन दिनकर कसबे यांच्या शेतातील कीटकनाशक फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीने तणनाशक टाकल्याने तब्बल 3 एकर द्राक्ष बाग जळून 20 लाखाचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. निर्यातक्षम द्राक्षावर पोषक द्रव्यांची फवारणी केल्यानंतर बाग सुकत असल्याचे दिसून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
अज्ञात व्यक्तीने फवारणी टाकीत तणनाशक टाकल्याने द्राक्ष बागेचे नुकसान - nashik farmer loss news'
वाडगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी वामन दिनकर कसबे यांच्या शेतातील कीटकनाशक फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीने तणनाशक टाकल्याने तब्बल 3 एकर द्राक्ष बाग जळून 20 लाखाचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

ना विमा कंपन्यांची मदत ना सरकारची मदत
वैयक्तिक वाद आणि गावगुंडीच्या राजकारणातून घडलेल्या या प्रकारामुळे या शेतकऱ्याचे पाच वर्षांचे न भरून निघणार नुकसान झाले आहे. यात या शेतकऱ्याला ना विमा कंपन्या मदत करू शकता ना सरकार त्यामुळे हा शेतकरी पुरता उध्वस्त झाला आहे. मात्र या प्रकरणाचे सूत्रधार गजाआड न केल्यास ग्रामीण भागात दुष्मनी काढण्याचा हा नवा पॅटर्न उदयास यायला वेळ लागणार नाही त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणातल्या आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी पोलीसाकडे केली आहे.
हेही वाचा -चार शेतकरी नेत्यांना ठार मारण्याचा कट, सिंघू सीमेवरून संशयीत ताब्यात