महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तौक्ते चक्रीवादळाचा सुरगाणा तालुक्याला फटका; शाळेची पत्रे उडाली, आंब्यासह शेतमालाचे नुकसान - Mango damage bhintghar

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तयार झालेल्या तौक्ते या चक्रीवादळामुळे सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Zilla Parishad school damage Sambarkhal
जिल्हा परिषद शाळा पत्रे उडाली सांबरखल

By

Published : May 17, 2021, 5:35 PM IST

नाशिक - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तयार झालेल्या तौक्ते या चक्रीवादळामुळे सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

वादळामुळे झालेल्या नुकसानीचे दृश्य

हेही वाचा -नाशिक जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरवात

आंब्यासह शेतमालाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणावर परिणाम नाशिक जिल्ह्यावर झाला नसला, तरी या वादळामुळे सुरगाणा तालुका मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये रविवारी दुपारपासूनच जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यात सुरगाणा तालुक्यात वादळी वारे निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणावर स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे. सुरगाणा तालुक्यातील सांबरखल या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची पत्रे वादळात उडून गेली, तर मनोहर राऊत यांच्या देखील घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाईची मागणी

सुरगाणा तालुक्यात सकाळी सात वाजेपासून जोरदार वादळी वाऱ्याला सुरुवात झाली होती. यामुळे सांबरखल येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर असलेली पत्रे या वादळाने उडाल्याने ती पत्रे परिसरातील कौलारू इमारत आणि मंदिरावर पडली. त्यामुळे, मंदिर आणि इमारतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर, सुरगाणा तालुक्यातील गुलाबी गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिंतघर या ठिकाणी देखील आंबा आणि इतर फळबागांचे चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून यामुळे बळीराजा पुन्हा एकदा हतबल झाला. कृषी विभागाने तत्काळ नुकसानीची पाहणी आणि पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा -नाशिक : पतंप्रधान मोदी जिल्हाधिकारी मांढरे यांच्याशी साधणार संवाद

ABOUT THE AUTHOR

...view details