नाशिक -गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 402 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, ह्यात सर्वाधिक नुकसान द्राक्ष पिकाचे आहे.
निर्यातक्षम द्राक्षाला तडे
नाशिक -गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 402 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, ह्यात सर्वाधिक नुकसान द्राक्ष पिकाचे आहे.
निर्यातक्षम द्राक्षाला तडे
या ना त्या कारणामुळे अडचणीत सापडलेला नाशिक जिल्ह्यातील शेतकरी गेल्या दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडला आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, निफाड, येवला या भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान द्राक्षाचे झाले असून पावसामुळे तयार झालेल्या निर्यातक्षम द्राक्षाला तडे गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे द्राक्ष स्थनिक बाजारात विकावा लागणार आहे.
दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. तसेच गुरुवारी आणि शुक्रवारी काही तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने गहू, हरभरा, द्राक्ष, कांदा आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. यात निफाड (210), दिंडोरी (120), येवला (12) हेक्टरवरील द्राक्ष पिकांचे नुकसान झाले आहे. गहू हरभरा पिकांवर पावसामुळे रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून काही ठिकाणी टोमॅटो वादळी वाऱ्यामुळे खाली पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.