महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अवकाळी पाऊस; नाशिक जिल्ह्यातील ५ हजार ७०२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान - nashik rain latest news

अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्याला मोठा तडाखा बसला आहे. ८६ गावातील ५ हजार ७०२ हेक्टरवरील पिके व फळबागा आडव्या झाल्या आहेत.

crops Damage
पावसामुळे पिकांचे नुकसान

By

Published : Mar 22, 2021, 10:02 PM IST

नाशिक - अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्याला मोठा तडाखा बसला आहे. ८६ गावातील ५ हजार ७०२ हेक्टरवरील पिके व फळबागा आडव्या झाल्या आहेत. तर, वीज पडून निफाडमध्ये एकाचा मृत्यू झाला असून, पशूधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर प्राथमिक पंचनामे पूर्ण केले असून, नुकसानीचा अहवाल शासनाला पाठवला आहे.

हेही वाचा -टीआरपी घोटाळा : अर्णबबाबत तपास यंत्रणांची भूमिका काय? मुंबई उच्च न्यायालय

निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना फटका

कोरोनामुळे अगोदरच शेतकरी संकटात आला असताना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका देखील सहन करावा लागत आहे. मागील एक आठवड्यापासून राज्यातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून सोबतीला अवकाळी पाऊस व गारपिट होत आहे. नाशिक जिल्ह्यातही अवकाळीचा फटका बसला आहे. अनेक तालुक्यांमध्ये अवकाळी पावसामुळे कादा, द्राक्ष,गहू,मका, बाजरी, ज्वारी, हरबर‍ा व भाजीपाल्याला फटका बसला असुन शेतकर्‍यांच्या हातातोंडांशी आलेला घास हिरावला गेला आह

सर्वाधिक नूकसान झालेल्या तालुक्यांमध्ये निफाड, दिंडोरी, सटाणा व मालेगावचा समावेश

जिल्ह्यात एकूण ५ हजार ३७७ हेक्टवरील पिके आडवी झाली

अवकाळी पाऊसामुळे जिल्ह्यात एकूण ५ हजार ३७७ हेक्टवरील पिके आडवी झाली आहेत. तर वार्षिक व बहुवार्षिक फळपिकांनाही अवकाळीचा तडाखा बसला आहे. पपई, आंबा, डाळिंब व द्राक्ष बागांचे नूकसान झाल्याचे अहवालावरुन समोर आले आहे. जिल्ह्यात एकूण ५ हजार ७०२ हेक्टरवरिल पिके व फळबागांना अवकाळीचा फटका सहन करावा लागला आहे. सर्वाधिक नूकसान झालेल्या तालुक्यांमध्ये निफाड, दिंडोरी, सटाणा व मालेगावचा समावेश आहे. दरम्यान या आस्मानी संकटामुळे शेतकरी संकटात सापडला असून शासनाच्या मदतीकडे त्यांचे लक्ष लागून आहे.

वीज पडून पशुधनाचे नूकसान

वीज कोसळून मालेगावमध्ये बैल, सिन्नरमध्ये गाय तर देवळ्यात शेळी मृत्यमुखी पडली आहे. कळवणमध्ये सोसाट्याच्या वार्‍यामुळव शाळेचे पत्रे उडाले आहेत. एकूणच अवकाळी पाऊस व गारपिटिने पशूधनाची देखील हानी झाली आहे.

हेही वाचा -देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढविली

ABOUT THE AUTHOR

...view details