महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फेसबूकवरचे प्रेम शिक्षिकेला पडले महागात, 55 लाखांचा गंडा - nashik news

शिक्षिकेची 2018 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून नायजेरियन युवकाशी ओळख झाली. युवकाने परदेशात राहत असून मोठ्या कंपनीमध्ये नोकरीला असल्याचे सांगितले. नंतर फेसबुक व्हॉटसअ‌ॅपवर दोघांनमध्ये संवाद होत राहिला. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

नाशकात नायजेरियन ट्रॅप
नाशकात नायजेरियन ट्रॅप

By

Published : Feb 10, 2020, 8:40 PM IST

नाशिक- प्रेम आंधळे असते असे म्हटले जाते. अशाच प्रकारे प्रेमातून नाशिकच्या शिक्षिकेला तब्बल 55 लाखांना गंडा घातला गेला आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असलेल्या महिलेची ओळख, फेसबुकच्या माध्यमातून एका परदेशी युवकाशी झाली. या मैत्रीत दोन वर्षांपासून या नायजेरियन युवकाने शिक्षिकेला विविध प्रलोभने देत तिच्याकडून तब्बल 55 लाख रुपयांची रक्कम उकळली. मित्राला मदत करण्यासाठी या शिक्षिकेने चक्क आपले घर विकून या युवकाला पैसे पाठवलेत. हे सगळे एका चित्रपटातील कथानका सारखं वाटत असले तरी या बाबत नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नाशकात नायजेरियन ट्रॅप

हेही वाचा-विदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांचे आणखी एक शिष्टमंडळ करणार काश्मीर दौरा..

पीडित शिक्षिकेची 2018 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून नायजेरियन युवकाशी ओळख झाली. युवकाने परदेशात राहत असून मोठ्या कंपनीमध्ये नोकरीला असल्याचे सांगितले. नंतर फेसबुक व्हॉटसअ‌ॅपवर दोघांमध्ये संवाद होत राहिला. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. याचा फायदा घेत तरुणाने एक गिफ्ट पाठवण्यासाठी शिक्षिकेला बँकेत पैसे भरण्यास सांगितले. सुरुवातीला दीड लाख व नंतर वेगवेगळी कारणे देत तब्बल 55 लाख रुपये त्याने शिक्षिकेकडून भरून घेतले.

तरुणाने मी दिल्ली येथे असल्याचे सांगत भारतीय चलन हवे असल्याचे शिक्षिकेला सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवत शिक्षिकेने चक्क स्वताचे एटीएम कार्ड, डेबिट कार्ड कुरिअर मार्फत दिल्लीला पाठवून दिले. तरुणाने कार्डद्वारे विविध ठिकाणी लाखो रुपयांची खरेदी केली. तुला परदेशात घेऊन जातो, असे त्याने शिक्षिकेला सांगितले. यासाठी शिक्षिकेने राहते घर विकले. यातून आलेले पैसेही तिने तरुणाला दिले.

नायजेरियन ट्रॅप म्हणजे काय?
एका सर्व्हेनुसार नायजेरियन देशातील 38 टक्के नागरिक विविध सोशल मीडियाचा वापर करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करता. सुरुवातीला सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करून नंतर भारतातील एखाद्या व्यक्तीला मध्यस्ती करुन त्याच्या खात्यावर पैसे मागविलेला जातात. समोरच्या व्यक्तीची आर्थिक फसवणूक करतात. यात तुम्हाला एक करोडचे बक्षीस लागले आहे. तुम्हाला महागड्या गाडीचे गिफ्ट लागले आहे, असे सांगून तुमचे गिफ्ट दिल्ली एअर पोर्टवर आले असून ते कस्टम विभागाने थांबवले आहे. त्यासाठी तुम्हाला भारतीय चलनात रक्कम भरावी लागेल, असे सांगून एखादा खाते नंबर दिला जातो. त्यावर पैसे भरण्यास सांगितले जातात. विश्वास संपादन करून सुरुवातील हजारो रुपये पाठवण्यास सांगितले जातात. नंतर एखादी व्यक्ती जाळ्यात अडकल्यावर लाखो रुपयांची मागणी केली जाते. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये. तसेच अशा प्रकारचे मॅसेज फोन आल्यास सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details