महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशकातील करन्सी नोट प्रेस 18 मेपासून सुरू होणार - nashik corona update

नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी व प्रेस आणि करन्सी नोट प्रेसमधील बंद ठेवण्यात आलेले काम 18 मे पासून पुन्हा सुरू केले जाणार आहे.

नाशकातील करन्सी नोट प्रेस 18 मेपासून सुरू होणार
नाशकातील करन्सी नोट प्रेस 18 मेपासून सुरू होणार

By

Published : May 16, 2020, 4:33 PM IST

नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी व प्रेस आणि करन्सी नोट प्रेसमधील बंद ठेवण्यात आलेले काम 18 मेपासून पुन्हा सुरू केले जाणार आहे. लॉकडाऊन काळात नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी व प्रेस आणि करन्सी नोट प्रेस बंद ठेवण्यात आली होती.

मात्र, आता लॉकडाऊन काळातदेखील प्रशासनाने सर्वच उद्योग, व्यवसायाला शिथिलता दिली असून येत्या 18 मे पासून कामकाज पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. ह्याबाबत लेखी ऑर्डर कामगारांना देण्यात आली आहे. मात्र, जे कामगार कंटेन्मेंट झोनमध्ये असतील किंवा आजारी आहेत त्यांना सध्या कामावर बोलावले जाणार नाही. हळूहळू गरजेनुसार वेगवेगळे सेक्शन सुरू करण्यात येणार असल्याचे आयएसपी मजूर संघाने सागितले आहे.

कामगारांना करण्यात आलेल्या सूचना -


- कामगारांनी कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.


- वारंवार हात धुवून घ्यावे, सॅनिटाझर, मास्क आणि हॅन्डग्लोजचा वापर करावा.


- ज्या कामगार बांधवांचा संपर्क पुणे, मुंबई, मालेगाव, औरंगाबाद तसेच बाहेरील बाधित देशतील व्यक्तींसोबत आला असेल अशा व्यक्तींनी प्रशासनाला न कळवता कामावर आल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


- लॉकडाऊन काळात कंपनीमधील कॅन्टिन बंद राहणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details