महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मनमाडला सीआरपीएफ जवानांचा रूटमार्च - ramjan eid

आगामी काळात रमजान ईद हा सण असल्यामुळे काही अपरिहार्य घटना घडू नये म्हणून, मनमाड उपविभागीय पोलीस उपअधीक्षक समिरसिंग साळवे यांच्या नेतृत्वाखाली सीआरपीएफच्या 100 जणांच्या तुकडीने शहरातील विविध भागात रूट मार्च केले.

CRPF route march
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मनमाडला सीआरपीएफ जवानांचा रूटमार्च

By

Published : May 22, 2020, 8:45 PM IST

नाशिक -कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच दोन दिवसांवर येऊ घातलेल्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आज मनमाड उपविभागीय पोलीस उपअधीक्षक समिरसिंग साळवे यांच्या नेतृत्वाखाली 'सीआरपीएफ'च्या जवानांनी मनमाड शहरात विविध ठिकाणी रूट मार्च काढला.

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मनमाडला सीआरपीएफ जवानांचा रूटमार्च

कोरोनामुळे देशावर मोठे संकट ओढावले आहे. दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू होते. आता काही राज्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. मात्र, आगामी काळात रमजान ईद हा सण असल्यामुळे काही अपरिहार्य घटना घडू नये म्हणून, मनमाड उपविभागीय पोलीस उपअधीक्षक समिरसिंग साळवे यांच्या नेतृत्वाखाली सीआरपीएफच्या 100 जणांच्या तुकडीने शहरातील विविध भागात रूट मार्च केले. अनेक ठिकाणी माईकवरून नागरिकांना आवाहन केले.

मनमाड शहर हे जवळपास सव्वा लाख लोकसंख्या असलेले शहर आहे. या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात मुस्लिम समाजातील नागरिक राहतात. आजपर्यंत एकही जातीय तेढ निर्माण करणारे किंवा जातीय दंगल शहरात घडलेली नाही. हीच परंपरा कायम राहावी, या हेतूने आणि सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून रूट मार्च करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details