महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 24, 2020, 1:56 PM IST

ETV Bharat / state

राज्यात संचारबंदी, मात्र नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गर्दीच गर्दी

राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. ह्यात भाजीपाला, किराणा, वैद्यकीय सुविधांना सूट देण्यात आली आहे. मात्र, ह्याचा गैरफायदा नागरिक घेत असल्याचे निदर्शनास येत आहे.

Crowd seen in Nashik Market amid state lockdown
राज्यात १०१ रुग्ण, मात्र नाशिककरांना नाही धास्ती; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गर्दी..

नाशिक - राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू असताना नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला विक्रेत्यांची आणि खरेदीदारांची गर्दी ओसांडली आहे. त्यामुळे, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली होणारी गर्दी प्रशासनाला चालते का, असा प्रश्न नाशिकमध्ये उपस्थित केला जात आहे.

राज्यात १०१ रुग्ण, मात्र नाशिककरांना नाही धास्ती; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गर्दी..

महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १०१ वर गेली असून अद्यापही नागरिकांना त्यांची धास्ती नसल्याचे चित्र नाशिकमध्ये बघायला मिळत आहे. राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. ह्यात भाजीपाला, किराणा, वैद्यकीय सुविधांना सूट देण्यात आली आहे. मात्र, ह्याचा गैरफायदा नागरिक घेत असल्याचे निदर्शनास येत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवार सकाळपासूनच भाजी खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.

हेही वाचा -दिंडोरी तालुक्यात 'डोअर टू डोअर' भाजीपाला विक्री

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्हाभरातून भाजीपाला विक्रीसाठी शेकडो गाड्या दाखल झाल्या आहेत. तर, हा शेतीमाल खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्राहाकांनी गर्दी केली होती. बाजारसमितीमध्ये येणाऱ्या शेतीमालाच्या गाड्यांना टप्याटप्याने बाजार समितीमध्ये सोडल्यास एकाच ठिकाणी होणारी गर्दी होणार नाही. तसेच शेतीमाल खरेदी करणाऱ्या किरकोळ भाजीविक्रेत्यांसाठी देखील हाच नियम लागू केल्यास गर्दी टाळता येईल. मात्र, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रशासनाला गर्दी चालते का ? असा प्रश्न आता नाशिकमध्ये विचारला जात आहे.

हेही वाचा -नाशिमध्ये इंधन खरेदीवर निर्बंध; दुचाकीला 100 रुपयांचे तर चारचाकीला...

ABOUT THE AUTHOR

...view details