नाशिक -लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय नागरिक आता आपल्या गावी निघाले आहेत. परप्रांतीय नागरिक गावी जात असल्यामुळे नाशिक रोड रेल्वेस्थानकावर गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वे स्थानकावर होणारी कोरोना चाचणी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारने 14 एप्रिल रात्री 8 वाजेपासून ते 30 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली असून, यामुळे पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होईल या भीतीने परप्रांतीय मजुरांनी घराची वाट धरली आहे. यामुळे रेल्वे स्थानकावर गर्दी झाली आहे. रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये, म्हणून ज्यांचे तिकीट आरक्षित आहे, अशाच प्रवाशांना सध्या रेल्वेने प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तसेच अनेक परप्रांतीय मजूर तर खासगी वाहानातून आपल्या कुटुंबाला घेऊन आपल्या गावी जात आहेत. या मजुरांमध्ये सर्वाधिक मजूर हे उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, झारखंडमधून आलेले आहेत.
कोरोना चाचणी बंद