सटाणा (नाशिक)- बागलाण तालुक्याच्या पश्चिम भागातील अलियाबाद व परिसरात गारांसह वादळी पावसाने हजेरी लावली. यात कांद्यासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
बागलाण तालुका परिसरात अवकाळी पाऊस, शेतीचे नुकसान - unseasonable rain in nashik
बुधवारी दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
बागलाण तालुका परिसरात अवकाळी पाऊस
बुधवारी दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अलियाबाद, जाड, गोळवाड, हरणबारी, बाभूळणे, अजंदे व मुल्हेर परिसरात तब्बल एक तास पाऊस पडला. वादळी वाऱ्यासह पडलेल्या गारांनी परिसरास झोडपून काढले. यात काढणीला आलेला व काढून शेतात पडलेल्या कांद्यासह मिरची, टोमॅटो, वालपापडी, आदी पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.