महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येवल्यात पावसाचे थैमान; पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

गेल्या काही दिवसांपासून येवला तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे काढणीला आलेली पीके व लावणीसाठी तयार केलेली कांद्याची रोपे खराब होत आहेत.

By

Published : Sep 20, 2020, 12:09 PM IST

Rain
पाऊस

नाशिक - येवल्यात पावसाने थैमान घातले असून तालुक्यातील अनेक नद्या-नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे कांदा, सोयबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी, अशी अपेक्षा शेतरकऱ्यांनी व्यक्त केली.

येवल्यात मुसळधार पावसाचे थैमान

काल रात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नाशिक-औरंगाबाद मार्गावरील देशमाने गावातील गोई नदीला पूर आला. नाशिककडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने फक्त एकेरी वाहतूक सुरू आहे. गोई नदीच्या पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेताला देखील तलावाचे स्वरुप आले आहे.

अंदरसूल येथेही कोळगंगा नदीला पूर आल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर, सावरगाव येथे कपाशी पिकात पाणी साचले आहे. हजारो हेक्‍टरवरील कांदा पिकाच्या रोपांचे नुकसान झाले असून काढणीला आलेल्या सोयबीन व भुईमूग पिकांचेही नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details