नाशिक -जिल्ह्यातील मालेगाव, कळवण तालुक्यात आज (दि. 6 सप्टें) सायंकाळी पावसाने जोरदार वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. यामुळे दोन्ही तालुक्यातील मका व उसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे तर तालुक्यातील अनेक ठिकाणी मक्याची पिके जमिनदोस्त झाले आहेत.
कळवण तालुक्यातील भेंडी, बेज गावातील मका पिक शेतकऱ्यांचे 30 ते 40 टक्के मका पिकाचे नुकसान झाले असून पंचनामा करुन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर सबंधित विभागाला मका पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश तहसिलदार बंडू कापसे यांनी दिले आहेत.