नाशिक - शिक्षा सुनावल्याचा राग येवून आरोपीने न्यायाधीशांवर चप्पल भिरकावल्याची घटना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात घडली. या घटनेमुळे न्यायालयात काहीकाळ गोंधळ उडाला. नाशिकच्या जिल्हा न्यायालयात मंगळवारी संध्याकाळी ही घडली.
मधुकर खंडू मोरे (वय-75, रा. वडाळा रोड, भारत नगर), असे चप्पल भिरकावणाऱ्या आरोपीचे नाव आहे. मधुकर मोरे यांनी शाळेत मुख्याध्यापिका असणाऱ्या पत्नीवर शाळेसमोर 27 फेब्रुवारी 2018 ला चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. या संदर्भात नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती. मोरे याला जिल्हा सत्र न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली.