नाशिक -देवळाली कँम्प परिसरातील सुंदर नगरमध्ये शुक्रवारी (ता.१२) मध्यरात्रीच्या सुमारास, अज्ञात गुंडांच्या टोळक्याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गुंडांनी तलवारी आणि कोयत्याचा वापर करत घरांची आणि वाहनांची तोडफोड केली. या घटनेत एक लहान मुलगा जखमी झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शहरातील लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे. अशात नाशिक उपनगरमध्ये अज्ञात गुंडांची दहशत वाढल्याचे दिसून येत आहे. काल शुक्रवारी मध्यरात्री देवळाली कँम्प परिसरातील सुंदर नगरमध्ये अज्ञात गुंडांनी दहा ते १२ घरांसह ३० ते ३५ वाहनांची मोडतोड केली. गुंडांनी तलवारी आणि कोयत्याच्या मदतीने घराच्या दरवाजे आणि खिडक्यांची तोडफोड केली. तसेच वाहनांचे नुकसान केले. यात एक लहान मुलगा जखमी झाला आहे.
माहिती देताना स्थानिक महिला... पोलिसांनी या प्रकरणात चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, याआधी काही दिवसांपूर्वीच देवळाली कँम्प परिसरातील हाडोला भागात गुंडानी गोळीबार केला होता. या प्रकरणाची दखल घेत आयुक्तालयाकडून देवळाली कँम्प पोलीस ठाण्यातील पाच पोलीसांचे निलंबित करण्यात आले. या प्रकरणात दोन हवालदार व तीन शिपाई यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याने, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई वरिष्ठांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे, असे उपआयुक्त विजय खरात यांनी सांगितले. सद्य देवळाली कँम्पमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनी या गुंडावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा -नाशकात चार वर्षाच्या चिमुरडीवर बिबट्याचा हल्ला, आजीच्या प्रसंगावधानामुळे वाचला जीव
हेही वाचा -तुमचा निषेध म्हणत..मालेगावच्या महापौरांनी सोडली पत्रकार परिषद; खासदार भामरेंच्या अचानक आगमनाने संतप्त