महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक पोलिसांसमोर वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान - नाशिक लेटेस्ट न्यूज

नाशिकमधील गुन्ह्यांचं वाढतं प्रमाण पाहता पोलिसांचा वचक कमी होत असल्याचं स्पष्ट होतंय. गेल्या शनिवारी म्हणजेच, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हाणामारीच्या सहा घटनांची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नाशिक
नाशिक

By

Published : Nov 18, 2020, 1:42 PM IST

नाशिक - शहरात दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांसमोर वाढती गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान उभं राहिले आहे. मागील महिन्याभरापासून शहरात खून, चेनस्नॅचिंग, चोऱ्या, बॅग लिफ्टिंग, हाणामारी, अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून नागरिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

गुन्हेगारी वाढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना

लॉकडाऊनमध्ये शहरातील गुन्हेगारी मोठ्या संख्येने कमी झाली होती. मात्र, अनलॉकनंतर पुन्हा एकदा शहरातील गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. शहरातील पंचवटी, भद्रकाली, अंबड, नाशिकरोड अशा भागात रस्त्यावरील गुन्हेगारींच्या संख्येत वाढ झाली आहे. लक्ष्मीपूजनाच्या एकाच दिवशी हाणामारीच्या सहा घटनांची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून टवाळखोरचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पोलिसांचे नाकेबंदीचे शस्त्र निकामी -

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी करून संशयित वाहनांची तपासणी केली. यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र, शहरातील गुन्हेगारी कमी होण्याचे चिन्हे दिसत नाही.

तडीपार गुन्हेगारांचे पोस्टर -

शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी आणि तडीपार गुन्हेगारांनी शहरात दाखल होऊ नये, यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच पोलीस ठाण्याच्याबाहेर तडीपार गुन्हेगारांचे पोस्टर लावण्यात आले आहे. तसेच तडीपार व्यक्ती शहरात फिरताना दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आव्हान पोलिसांनी केले आहे.

सिंघम स्टाईल पोलीस अधिकाऱ्यांची गरज -

मागील सहा ते सात वर्षापूर्वी शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढल्याचे चित्र होते. अशात तत्कालीन पोलीस आयुक्त सरंगल यांनी सिंघम अधिकाऱ्यांची एक टीम तयार करत गुन्हेगारीचा बिमोड केला. यात सिंघम अधिकारी म्हणून ओळख निर्माण केलेल्या तत्कालीन पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांची गुन्हेगारांमध्ये दहशत होती. या काळात पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर तडीपारी, एमपीडी कायद्याअंतर्गत कारवाई, गुन्हेगारांची शहरातून धिंड यासारख्या कारवाया करत, गुन्हेगारांवर वचक निर्माण केला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा शहरात सिंघम अधिकाऱ्यांची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा -नाशिक : देवळालीत मध्यरात्री युवकाची हत्या... घटना सीसीटीव्हीत कैद

ABOUT THE AUTHOR

...view details