नाशिक -शहरातील गुन्हेगारांनी पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. मागील आठ दिवसात वेगवेगळ्या घटनांनी नाशिक शहर हादरून गेले आहे. शहरात गुन्हे घडत असताना पोलीस नेमके काय करत आहेत, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नाशिक शहरात खून, घरफोडी, एटीएम फोडण्याचा प्रयत्न, मोबाईल चोरी, सोनसाखळी चोरी, अपहरण, मोटारसायकल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. एकीकडे जिल्ह्यात या घटना घडत आहेत. तर या दरम्यान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सापडले. यामुळे पोलीस यंत्रणा काय करत आहे? त्यांच्यावर विश्वास ठेवावा की नाही, असा संभ्रम नाशिककरांना पडला आहे.