महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येवल्यात कोरोनाचा दुसरा बळी; मृत्यूनंतर तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह - नाशिक कोरोना अपडेट

येवला तालुक्यामध्ये सध्या केवळ 7 रुग्ण हे अ‌ॅक्टिव्ह आहेत. कोरोना बाधितांची संख्या ही हळूहळू वाढत असल्याने शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे. येवला शहरात पहिल्या टप्प्यामध्ये 32 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

yeola
येवल्यात कोरोनाचा दुसरा बळी

By

Published : Jun 7, 2020, 10:32 AM IST

येवला (नाशिक) - येवला तालुक्‍यात आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. येवल्यामध्ये मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या आता दोन झाली आहे. तालुक्यातील न्याहारखेडे गावातील मृत झालेल्या 39 वर्षीय तरुणाचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला. कोरोनाबाधितांची एकूण संख्या 50 झाली असून, त्यापैकी 41 रुग्णांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे.

येवला तालुक्यामध्ये सध्या केवळ 7 रुग्ण हे अ‌ॅक्टिव्ह आहेत. कोरोना बाधितांची संख्या ही हळूहळू वाढत असल्याने शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे. येवला शहरात पहिल्या टप्प्यामध्ये 32 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यावेळी येवला तालुका हा संपूर्णपणे कोरोनामुक्त झाला होता. मात्र, आता परत कोरोनाने हळूहळू पाय पसरण्यास सुरुवात केली आहे.

ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला असून, कोरोनामुळे शहरात शुक्रवारी रात्री पहिला बळी गेला. लगेच शनिवारी रात्रीच्या सुमारास 39 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. हा तरुण ग्रामीण भागातील असून, त्याला त्रास होत असल्याने नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल हा कोरोनाबाधित आला.

ABOUT THE AUTHOR

...view details